राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : न्यूटनसह कच्चा लिंबूने मारली बाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 
नवी दिल्ली : आज ६५वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये हिंदी भाषेत 'न्यूटन' या चित्रपटाने तर मराठी भाषेत प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाने बाजी मारली आहे. राजकुमार रावच्या 'न्यूटन'ला जागतिक स्तरावर मोठी प्रशंसा मिळाली आहे. तर 'कच्चा लिंबू'चा विषय वेगळा असल्या कारणाने देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. आता या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. या चित्रपटांच्या निवडीसाठी परीक्षकांचे नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
याच बरोबर मराठी चित्रपट 'म्होरक्या' ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील 'विशेष उल्लेखनीय' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले आहे. तसेच नागराज मंजुळे यांचा लघुपट 'पावसाचा निबंध' याला देखील विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित 'मयत' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
 
याच सोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीत 'मॉम' या चित्रपटासाठी दिवंगत कलाकार श्रीदेवी यांना पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत "रिद्धी सेन" यांना बंगाली चित्रपट 'नगर कीर्तन'साठी पुरस्कार मिळाला आहे. तर 'सर्वात लोकप्रिय चित्रपट' या श्रेणीत 'बाहुबली : द कन्क्लूजन' या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या बाहुबलीला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.
 
 
 
 
सर्वोत्कृष्ट संगीतकार या श्रेणीत प्रसिद्ध संगीतकार ए.आर रेहमान यांना तर सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक या श्रेणीत गणेश आचार्य यांना 'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटातील 'गोरी तू लठ्ठ मार' या गाण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना 'दादा साहेब फाळके' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@