सुशील कुमार मोदींच्या भूमिकेला मनसेचा पाठींबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |


मुंबई : बिहार स्थापनादिनानिमित्त बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी काल मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलेल्या मतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पाठींबा दिला आहे. महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या बिहारी जनतेनी येथील मातृभाषा आत्मसात करावी, असे मोदी यांनी व्यक्त केलेल्या मताला मनसेनी पाठींबा दिला असून मनसेची देखील भूमिका आहे, असे पक्षाने म्हटले आहे.

मनसेनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याविषयी माहिती दिली आहे. मुंबईमध्ये बिहार स्थापनादिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला काल मोदी यांनी आपली उपस्थितीती लावली होती. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेला मराठी भाषा शिकण्याचे आवाहन त्यांनी केले होते. 'मुंबईत रोजीरोटीसाठी राहत असलेल्या बिहारी बांधवांनी येथील समाजाशी नाळ जोडण्यासाठी इथल्या मातीशी समरस होण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे,' असे मत त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये मांडले होते. यावर मनसेनी आपले मत मांडत, मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील हीच आग्रही भूमिका असल्याचे म्हणत, अप्रत्यक्षपणे का होईना, मोदी यांच्या मतांशी आपली सहमती असल्याचे दर्शवले आहे.

@@AUTHORINFO_V1@@