राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलिया येथील गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ सुरु आहे. या स्पर्धेत भारताचे खेळाडू खेळाचे उत्तम प्रदर्शन दाखवत आहेत. भारताच्या खात्यात आत्तापर्यंत १७ सुवर्ण, १० रजत आणि १२ कांस्य पदके जमा झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताला यावर्षी सर्वाधिक पदके मिळाली आहे.
 
 
 

 
 
 
भारताकडून यावर्षी सर्वाधिक खेळाडू या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया येथे गेली होती. त्यामुळे या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी देखील मेहनत घेत भारताच्या खात्यात सध्या एकूण ३९ पदके जमा केली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
 
 
यावर्षी भारताला नेमबाजी, बॅटमिंटन, रेसलिंग, वेटलीफ्लिंग या खेळांमध्ये सर्वाधिक पदके मिळाली आहेत. या खेळांमध्ये भारताच्या खेळाडूंनी यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अजून देखील पदक संख्या वाढू शकते आता शेवटचा पदकांचा आकडा किती येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@