काम बंद पाडून काँग्रसकडून संविधानाचा अपमान : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : संसदेचे काम बंद पाडून काँग्रेस पक्ष संविधानाचा व संसदेचा अपमान करत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत विलेपार्ले येथील भाजप कार्यालयात उपोषण व धरणे आंदोलनात सहभागी झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 
विलेपार्ले येथील या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, खा. परेश रावल, मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार आशिष शेलार व आ. पराग अळवणी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संसद हे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीचे व्यासपीठ आहे. पण, विरोधकांना तेच काम बंद पाडण्यात धन्यता वाटते आहे. आपल्यासाठी सर्वोच्च असलेल्या संविधानाचा त्यामुळे अपमान होतो आहे. विरोधकांनी आपल्या या कृत्याबद्दल देशातील नागरिकांना उत्तर दिले पाहिजे. त्यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक विषयांवर खुलेपणाने चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. समाजातील अंतिम घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक न्यायासाठी अतिशय वचनबद्धतेने काम होत आहे. या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आहे. विरोधकांनी इतके वर्ष सत्तेत असताना गरीब, वंचितांसाठी काय केले, याचे उत्तर आज देशाला जाणून घ्यायचे आहे, असाही टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
 
 
  
 
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांनी औरंगाबाद येथे उपोषण केले. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे व त्याचे काम रोखून काँग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी संसदेचा अपमान करत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष भाजपाशी स्पर्धा करू शकत नाही त्यामुळे तो पक्ष संसदेचे कामबंद पाडत आहे व जनतेची दिशाभूल करत आहे. लोकशाहीत पक्षाच्या कामगिरीचे मूल्यमापन निवडणुकांवरून होत असते व आजच राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुकीत सहापैकी चार नगराध्यक्षपदे जिंकून भाजपाला घवघवीत यश मिळाले असल्याचे दानवे यांनी यावेळी नमूद केले.
 
@@AUTHORINFO_V1@@