आठ पैकी पाच प्रभाग समित्यांवर भाजपचा झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |

शिवसेनेचा तीन ठिकाणी विजय
सात प्रभाग समित्या बिनविरोध
 

  

मुंबई : मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी आज ८ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूका झाल्या. यामधील पाच ठिकाणी भाजप तर तीन ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला आहे. आठ पैकी सात समित्यांच्या निवडणूका बिनविरोध झाल्या तर एका प्रभाग समितीसाठी निवडणूक झाली.
 
‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ या एका प्रभाग समितीसाठी निवडणूक होऊन भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय सेनेच्‍या उमेदवार गीता गवळी निवडून आल्या. गवळी यांना १२ पैकी ७ मते मिळाली. ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’, ‘सी’ आणि ‘डी’, ‘एफ/दक्षिण’ व ‘एफ/उत्तर' तसेच 'जी/दक्षिण' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी कामकाज पाहिले. तर ‘पी/दक्षिण’, ‘पी/उत्तर’, ‘आर/दक्षिण’, ‘आर/उत्तर’ आणि ‘आर/मध्य’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कामकाज पाहिले.
 
तर ‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे अतुल शहा, ‘एफ/दक्षिण’ आणि ‘एफ/उत्तर' प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे सचिन पडवळ, ‘जी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्‍या किशोरी पेडणेकर, ‘पी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे संदीप पटेल, ‘पी/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपाच्या जया सतनाम सिंग तिवाना, ‘आर/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे शिवकुमार झा, ‘आर/उत्तर’ आणि ‘आर/मध्य’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्‍या रिद्धी खुरसंगे यांची बिन‍विरोध निवड झाली.
 
@@AUTHORINFO_V1@@