इंदौर येथील परिषदेत ३७ महापौरांच्या स्वाक्षऱ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी घोषणापत्र

नागपूर,
स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी आशियातील सुमारे ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षèया केल्या. इंदौर येथील ब्रिलियंट कन्व्हेंशन सेंटरच्या ग्रॅण्ड हॉलमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल थ्री आर फोरम इन एशिया अ‍ॅण्ड दी पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंदौरच्या महापौर मालिनी गौड यांनी सदर घोषणापत्र सादर केले.
 
या घोषणापत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यां मध्ये नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांचाही समावेश आहे. सन २०३० पर्यंत कचऱ्यांच्या समस्येपासून मुक्ती मिळविणे हा या घोषणापत्राचा उद्देश आहे. यासाठी घोषणापत्रानुसार, थ्री आर (रिड्युज, रिसायकल, रियूज) या त्रिसूत्रीच्या आधारावर आशिया खंडातील सर्व देश एकत्र येऊन काम करतील आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘मिशन झीरो वेस्ट’ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. या परिषदेत असेही ठरविण्यात आले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या बैठकीत यावर करण्यात येणाऱ्या कार्याबद्दल सर्व देश आपली भूमिका मांडतील आणि माहिती देतील. विस्तृत चर्चेनंतर सदर घोषणापत्रावर ३७ शहरातील महापौरांनी सहमती दर्शविली. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासह नागपूर मनपाचे अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते हे सुद्धा परिषदेत सहभागी झाले होते.
कचरामुक्तीच्या दिशेने पाऊल : महापौर
घोषणापत्र म्हणजे कचरामुक्तीच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. या घोषणापत्रानुसार आता नागपूरमध्ये कचरामुक्तीसाठी, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी कार्य केले जाईल. आशिया खंडातील विविध देशांनी घेतलेल्या या पुढाकाराचा फायदा नागपूरला होईल, यात शंका नाही, असे मत महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@