पहा, 'पीआयबी'ची दिवाळखोरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |

 
६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच दिल्ली येथून 'पीआयबी' (प्रेस इन्फर्मेशन ब्युरो)च्या कार्यालयातून करण्यात आली. याचे 'लाईव्ह' प्रक्षेपणही सोशल मीडिया वरूनही करण्यात आले आहे. हिंदी मध्ये 'न्यूटन' तर मराठीत 'कच्चा लिंबू' चित्रपटाने बाजी मारली. पण 'अति घाई संकटात नेई' म्हणतात ना, तसं काहीसं झालाय. 'पीआयबी'च्या ट्विटर हँडलवरून पुरस्कार मिळालेल्या चित्रपटाचे नाव आणि त्याचे पोस्टर अशा वैयक्तिक पोस्ट करण्यात येत आहेत. तर 'कच्चा लिंबू' या मराठी चित्रपटाची घोषणा बरोबर केली आहे पण फोटो मात्र सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'कच्चा लिंबू' या चित्रपटाचा वापरण्यात आला आहे. कालांतराने ही चूक लक्षात आल्यावर हे ट्विट डिलिट केले जाईल यात शंका नाही. पण सोशल मीडियावर कोणत्याही पोस्ट करताना ती एकदा तपासून घ्यावी इतकीच माफक अपेक्षा.
 
 
 
नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ज्या 'कच्चा लिंबू' चित्रपटाला गौरविण्यात आले आहे त्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक याने केले होते. यामध्ये सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, सचिन खेडेकर व मनमित पेम यांची प्रमुख भूमिका होती. 'स्पेशल चाईल्ड' या विषयावर हा चित्रपट आधारित होता.  
 

 
 
 

@@AUTHORINFO_V1@@