अमेरिकेने स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू नये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |

बोलिव्हियन राजदूताचे संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेला खडेबोल




न्यूयॉर्क : 'अमेरिका स्वतःला जगातील सर्वात शक्तीशाली देश समजत असून स्वतःला कायद्यापेक्षा देखील मोठा समजत आहे. परंतु अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा मान राखावा व स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, अशा शब्दात बोलिव्हिया या देशाने अमेरिकेची कानउघडणी केली आहे. बोलिव्हियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत साचा लोरेंटी यांनी अमेरिकेची कानउघडणी केली असून अमेरिकेने सिरीयावर हल्ला करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला.

रशियातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अमेरिका स्वतःला सर्वात शक्तिशाली देश समजत आहे, अशी टीका केली. तसेच अमेरिकाने हे ध्यानात घ्यायला हवे कि, सिरीया संबंधी संयुक्त राष्ट्रांनी मिळून काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. त्यामुळे सिरीयावर हल्ला करणे म्हणजे एक प्रकारे संपूर्ण संयुक्त राष्ट्रांच्या मर्यादांचे आणि कायद्यांचे उलंघन करण्यासारखे आहे, असे लोरेंटी यांनी म्हटले. याचबरोबर अमेरिकेने सिरीययावर हल्ला करण्याची आपली योजना मागे घ्यावी, असे त्यांनी म्हटले.

गेल्या आठव्यामध्ये सिरियातील डोमा या शहरावर झालेल्या रासायनिक हल्लामुळे अमेरिकेने रशिया आणि इराण या देशांवर चांगलीच आगपाखाड केली होती. तसेच रशिया आणि इराणला या हल्लासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देत सिरीयावर एअर स्ट्राईक करण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उघडली होती. अमेरिकेने आपला निर्णय मागे घ्यावा, असे देखील देशांनी सुचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अमेरिकेने सर्व देशांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले होते.
@@AUTHORINFO_V1@@