राज्यात ११ हजार २४७ गावे झाली 'जलयुक्त'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

७६ हजार शेततळ्यांचे काम पूर्ण तर ७७ हजार विंधन विहिरी प्रगतीपथावर

 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार' योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत राज्यात ११ हजार २४७ गावे जलयुक्त झाल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. तसेच, उर्वरित गावे जून, २०१८ अखेर पूर्ण करावीत, असेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेत निवडलेल्या गावांपैकी ११ हजार २४७ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी निवडण्यात आलेली ५०३१ गावे जून, २०१८ अखेरपर्यंत जलपरिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये या योजनेची कामे पूर्ण झाली नाहीत तेथे गती देऊन वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले. नागपूर, वर्धा, नंदूरबार, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये योजनेचे काम ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. २०१८-१९ साठी ६२०० गावांची निवड झाली असून त्यामध्ये कोकण विभागातील ३००, पुणे ९००, नाशिक ११००, औरंगाबाद १४००, अमरावती १३००, नागपूर १२०० गावांची निवड करण्यात आली आहे. ३० जून, २०१८ पर्यंत टप्पा एक नुसार कार्यवाही करण्यात यावी. नोव्हेंबर ते मार्च, २०१९ पर्यंत टप्पा एक मधील कामे पूर्ण करावीत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधीची कुठलीही कमतरता नसून ही कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता एक हजार कोटी रुपयांचा निधी उद्या वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषित केले.
 
७६ हजार १०६ शेततळ्यांचे काम पूर्ण
राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १ लाख १२ हजार ३११ शेततळ्यांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ३४ जिल्ह्यांमध्ये ७६ हजार १०६ शेततळी पूर्ण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार ९९ शेततळी पूर्ण करण्यात आली आहे. मनरेगा, धडक सिंचन विहिरी, ११ हजार सिंचन विहिरी योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत १ लाख २६५ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३३ जिल्ह्यांमध्ये ७६ हजार ६८९ विहिरींचे काम प्रगतीपथावर असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@