राष्ट्रकुल स्पर्धा : राहुल आवरेला सुवर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |


भारताला १३ वे सुवर्ण पदक


गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : ५७ किलो वजनी गटाच्या फ्री-स्टाईल प्रकारात भारताच्या राहुल आवारेला सुवर्ण पदक मिळाले आहे. कॅनडाच्या स्टिव्हन तक्हाशीला १५-७ अश्या गुणांनी मागे टाकत ही स्पर्धा जिंकली आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला हरवून राहुलने अंतिम फेरीत धडक मारली होती.
राहुलच्या या विजयामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दरम्यान, भारताच्या बबिता कुमारीला महिला फ्री-स्टाईल ५३ किलो वजनी गटात रजत पदक मिळाले आहे.


तेजस्विनी सावंतला रजत पदक


भारताच्या तेजस्विनी सावंत हिने ५० मीटर रायफल प्रॉन या क्रिडा प्रकारात भारताला रजत पदक मिळवून दिले आहे. सिंगापूरच्या मार्टिना लिंड्से बरोबरच्या खेळात तिने ही कामगिरी केली आहे.
तसेच, नीरज कुमार आणि आशिष भानवाला यांची स्पर्धा आजच्या दिवसासाठी लाईन अप आहेत.


राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेच्या आजच्या ८ व्या दिवशी भारत तिसऱ्या क्रमांकावर असून भारताच्या खात्यात १३ सुवर्ण, ६ रजत, ८ कांस्य अशी एकूण २७ पदक संख्या झाली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून तेजस्विनी सावंत, राहुल आवारे आणि बबिता कुमारीला शुभेच्छा दिल्या आहेत - 

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@