पंतप्रधान मोदींचे आज एकदिवसीय उपोषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |




नवी दिल्ली :
संसदेच्या कामकाजामध्ये विरोधकांनी निर्माण केलेल्या अडथळ्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवशीय उपोषण करणार आहेत. पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारमधील सर्व वरिष्ठ मंत्री आणि भाजप अध्यक्षांसह सर्वच भाजप कार्यकर्ते देखील आज उपोषण करणार आहेत.


'राजकीय पराभवामुळे त्रस्त झालेल्या विरोधकांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी संसदेचे कामकाज ठप्प पाडले आहे. सरकार चर्चेसाठी तयार असताना देखील सामान्य जनतेसाठी काम करू पाहणाऱ्या संसदेला यांनी वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्यामुळे लोकशाहीची गळचेपी करू पाहणाऱ्यांचा खरा चेहरा देशसमोर येणे आता गरजेचे आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी आपल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. तसेच भाजपच्या सर्व नेत्यांनी यात मोठ्या संख्याने सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. तसेच आपण एक दिवसाचे स उपोषण जरी क करत असलो, तरी देखील आपली दैनंदिन कामे मात्र नेहमी प्रमाणे सुरूच राहतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. 

८ वर्षात सर्वात कमी कामकाज

 सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध कार्याचा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून विरोधकांनी वारंवारपणे संसदेला वेठीस धरण्याचे सत्र सुरु केले आहे. गेल्या वर्षीच्या हिवाळी आणि पावसाळी अधिवेशानामध्ये देखील विरोधकांनी खोड घातला होता. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती असताना विरोधकांच्या या कृतीमुळे विरोधकांची कानउघडणी करण्याची देखील वेळ त्यांच्यावर आली होती. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकही दिवस विरोधकांनी सभागृहाचे कामकाज होऊ दिलेले नाही. गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत यंदा संसदेत सर्वात कमी कामकाज झाले आहे. .


दरम्यान केंद्र सरकारमधील सर्व मंत्री आपापल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन हे एकदिवसीय उपोषण करणार आहेत. भाजपच्या आमदारांना देखील आपापल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन उपोषण करण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. विरोध आपल्या स्वार्थासाठी देशाचे नुकसान करत आहेत, त्यामुळे त्यांना जनतेसमोर उघडे पाडा, असे आवाहन भाजपने केले आहे.


@@AUTHORINFO_V1@@