मनसेची मैदानात उतरण्याची तयारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |
 
 
 
जळगाव :
मनसेचे नेते माजी आ. दीपक पायगुडे, पक्षाचे उपाध्यक्ष विजय तळवलकर (पुणे) १५ एप्रिलपासून जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, ते संघटनात्मक बांधणी आणि सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. विधानसभेसाठी ही पूर्वतयारी असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
पक्षाच्या वतीने राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली जात आहेत. २० एप्रिलपर्यंत हे काम चालणार असून, त्या आधारे तयार करण्यात आलेला अहवाल पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. प्रत्येक भागातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, सद्यस्थिती आणि भविष्यातील रणनीती काय असावी? आदी मुद्यांचा यात समावेश असणार आहे. या अहवालाच्या अनुषंगाने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरविली जाणार आहे.
 
 
पदाधिकार्‍यांचा जिल्हा दौरा
माजी आ. दीपक पायगुडे व पक्षाचे उपाध्यक्ष विजय तळवलकर (पुणे) १५ ते १७ एप्रिल जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. ते आजी-माजी पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांची भेट घेणार आहेत. १५ रोजी जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, १६ रोजी यावल, चोपडा, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, १७ रोजी जळगाव, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव असा दौरा राहील. जळगाव येथे अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठक होणार असल्याचे पक्षाचे जिल्हा सचिव ऍड. जमील देशपांडे यांनी कळविले आहे.
जळगाव मनपाचा अद्याप निर्णय नाही
जळगाव महापालिका निवडणूक लढवायची की, नाही याचा निर्णय अद्याप पक्षप्रमुखांनी घेतलेला नाही. पण पक्ष सांगेल त्यावर अंमलबजावणी करण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मानसिकता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@