किदांबी श्रीकांत वर्ल्ड नं १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |



पुणे : भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत हा पुरूष एकेरीमधला वर्ल्ड नंबर वन ठरला आहे. आज वर्ल्ड बॅडमिंटन असोसिएशनी जाहिर केलेल्या रॅंकिकमध्ये ही माहिती मिळाली आहे. २५ वर्षीय किदांबी डेन्मार्कच्या व्हिटोक अलेक्सनला मागे टाकत हा किताब पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

७६,८९५ गुण मिळवत श्रीकांत वर्ल्ड नंबर वन ठरला आहे. आत्तापर्यंत श्रीकांत १७४ सामने जिंकला असून, ८३ सामन्यांमध्ये त्याला हार पत्करावी लागली आहे. तसेच आत्तापर्यंत त्याने ११ किताब मिळवले असून आज मिळालेला वर्ल्ड नंबर वनचा किताब हा सर्वोच्च समजला जातो.

नुकतचं किदांबीने सध्या चालू असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.

सध्या ट्विटरवर किदांबीवर कौतुकाचा वर्षाव होत असून सर्वांना तुझा प्रचंड अभिमान असल्याच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@