थाळीफेक स्पर्धेत भारताने केली रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

 
 
गोल्टकोस्ट :  ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताची उत्तम कामगिरी दर दिवशी सुरु आहे. आज भारताने थाळीफेक स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. सीमा पूनिया हिने या स्पर्धेत रौप्य पदक तर नवजीत ढिल्लों हिने कांस्य पदक पटकावले आहे.
 
 
 
 
 
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या डानी स्टीवन्सने ६८.२६ मीटर पर्यंत थाळीफेक करत सुवर्ण पदक पटकावले तर सीमा पूनिया हिने ५८.९ मीटर पर्यंत आणि नवजीत ढिल्लों हिने ५७.४३ मीटर पर्यंत थाळीफेक करत अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.
 
राष्ट्रकुल खेळांच्या ८ व्या दिवशी भारतीय कुश्तीपटू बबीता कुमारी हिने ५३ किलोच्या श्रेणीत रौप्य पदक पटकावले आहे. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनेडाच्या डायना वीकर हिच्या सोबत होता. एकूणच राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू भारताचे नाव उंचावण्यात यशस्वी ठरले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@