मुंबईत टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

एमटीबीआरचे ४८९१ रुग्ण आढळले

 

 
 
मुंबई : मुंबईत टीबीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात एकूण एमटीबीआर क्षयरोगाच ४८९१ रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी पालिका सभागृहात दिली.
 
भाजपच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरमध्ये किती एमटीबीआर क्षयरोगचे किती रुग्ण आहेत? पालिकेच्या २२७ नगरसेवकांच्या प्रत्येक प्रभागात क्षयरोगाच्या रुग्णांसाठी मुंबई महानगर पालिकेतर्फे टीबी उपलब्ध आहेत का असा सवाल विचारला होता. त्यावर मुंबईत एमटीबीआर क्षयरोगाचे ४८९१ रुग्ण आढळले असून मुंबई महानगर पालिकेकच्या २६७ दवाखाने, आरोग्य केंद्र आणि रुग्णालये येथे डॉट्स केंद्र उपलब्ध आहेत व त्या मार्फत मोफत औषधउपचार केला जातो. तसेच १३० मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शी केंद्रव्दारे क्षयरुग्णांचे मोफत निदान केले जाते. महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी हे १००० आंत्ररुग्णांचे एकमात्र मोठे विशेष रुग्णालय क्षयरुग्णांसाठी उपलब्ध आहे, असे जऱ्हाड यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@