गिरीशभाऊंचा दबदबा वाढला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

नेतृत्त्व, क्षमता पुन्हा एकदा सिध्द

 
 
जळगाव, १२ एप्रिल :
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या गावात जामनेरमध्ये गुरुवारी ‘न भूतो’ असा चमत्कार दाखविला. स्थानिक नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व २५ जागांवर केवळ अन् केवळ भाजपचेच उमेदवार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली. विशेष म्हणजे या निवडणुकीत ‘विरोधक’ नावालाही शिल्लक राहिलेले नाहीत. संपूर्ण भारतभरात ‘२५-०’ अशा तर्‍हेचा कदाचित हा पहिलाच निकाल असावा, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
 
 
निवडणुकीत एका बाजूला भाजप आणि दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सामना रंगला होता. गिरीश महाजन राज्यात मंत्री असल्यामुळे सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे होते. ना. महाजन यांनी प्रचारादरम्यान केवळ विकासाच्या मुद्यावर जनतेकडे कौल मागितला होता. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत जामनेरकरांनी यंदा प्रथमच भाजपाला एकहाती सत्ता सोपविली. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी साधनताई गिरीश महाजन या निवडून आल्या असून, अन्य २४ जागांवर देखील भाजपने दणदणीत विजय संपादन केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे संजय गरुड व पारस ललवाणी यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे जामनेकरांनी बघितले.
 
 
आजच्या या निकालामुळे ना. गिरीश महाजन यांचे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातील वजन वाढले आहे. त्यांचे नेतृत्त्व, क्षमता यावर पक्षाच्या धुरिणांनी ठेवलेला विश्‍वास पुन्हा एकदा कसोटीवर खरा उतरला आहे. मी-मी म्हणणार्‍यांनी आतापर्यंत या पध्दतीने कधीच सत्ता हस्तगत केल्याचे ऐकिवात नाही. त्या दृष्टीनेही जामनेरमधील निकाल ऐतिहासिक ठरला आहे.
 
 
केवळ जामनेरच नव्हे, तर जळगाव महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीतही ‘जामनेर पॅटर्न’चा दबदबा राहणार असल्याचे आताच स्पष्ट झाले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास बळावला आहे. पक्षाचे विधान परिषद सदस्य आ. चंदुलाल पटेल यांनी तर जळगावमध्ये ‘७५-०’ची भाषा केली आहे. भविष्यात राज्यभरात सर्वत्र ‘शत-प्रतिशत भाजप’चे वादळ आल्यास त्याचे खरे श्रेय मात्र आपल्या गिरीशभाऊंनाच द्यावे लागेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@