जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गावात भाजपचा एकतर्फी विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

नगरपालिकेच्या संपूर्ण २५ जागांवर कमळ फुलले

 
 

 
 

 
जळगाव, १२ एप्रिल :
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणूकीच्या निकालाकडे होेते. कारण जामनेर म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे होमपीच तेथील नगरपालिकेच्या निवडणूकीचा निकाल १२ एप्रिल रोजी जाहीर झाला. संपूर्ण २४ नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना गिरीश महाजन यांच्यासह संपूर्ण २५ जागांवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध करुन एकतर्फी विजयी झाले.
 
 
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत गुरूवारी भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाने पालिकेच्या सर्व २५ जागांवर बाजी मारली. तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रा. अंजली पवार यांच्यावर ८ हजार ३५३ मतांनी विजय मिळवला. गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत २५ जागांवर विजयी झाला आहे. निवडणूकीच्या निकाल जाहीरत होताच कार्यकर्त्यांनी सर्वदूर गुलाल उधळून, भाजपाचे झेंडे फकविले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@