कॉंग्रेस आता कर्नाटकचीही निवडणूक गमवणार - अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |
भाजपच्या देशव्यापी निषेधामध्ये अमित शहा सामील
 
 
 
 
धारवाड : काँग्रेस देशामध्ये द्वेष पसरवत आहे आणि देशात विभाजनाचे राजकारण करत आहे परंतु देशाच्या जनतेने त्यांची ही रणनीती अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेतली आहे. कॉंग्रेसने २०१४ पासून देशातील सर्व प्रमुख निवडणुका गमावल्या आहेत आणि तेच कर्नाटकमध्येही लवकरच होणार आहे. असा ठाम विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज व्यक्त केला.
 
 
 
कर्नाटकच्या धारवाडमध्ये काँग्रेसच्या विभागीय राजकारणाविरूद्ध भारतीय जनता पक्षाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यामध्ये आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखील सामिल झाले असून त्यांच्यासोबत भाजपचे कर्नाटकचे अध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पादेखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी शहा बोलत होते. धारवाडमधील या निषेधासोबतच सर्व भाजपा खासदार देशभरातील जिल्हा मुख्यालयांवर उपोषण कॉंग्रेसच्या लोकशाहीविरोधी व विकासविरोधी चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी उपोषणाला बसले आहेत.
यावेळी अमित शहा म्हणाले की, कॉंग्रेसला वादविवादाची इच्छा नाही पण फक्त आवाज करायचा होता. "काँग्रेस पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही. आपल्या स्वतःच्या घरातील लोकशाही त्यांनी ओलीस ठेवली आहे. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाही नाही तर ते देशामध्ये लोकशाही वाचवू शकत नाहीत. तसेच काँग्रेसला हे चांगले माहीत आहे की ते कोणत्याही सभागृहात चर्चा करू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी संसदेचे काम करू दिले नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुस-या टप्प्यात वातावरण खराब केले आणि संपूर्ण सत्रात अडथळा निर्माण केला, लोकशाहीचे लोक त्यांना कधीच माफ करणार नाहीत. देशाच्या गरीब कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमध्ये विरोधी पक्षाचे हे गैरजबाबदार वृत्ती अडचणी निर्माण करणार आहे. काँग्रेसचा जनकल्याणाशी काहीही संबंध नाही, परंतु त्याचा उद्देश संसदेबाहेर असंतोष निर्माण करून विखुरलेल्या व अस्थिरतेच्या राजकारणाचा आहे. अशी टीकाही शहा यांनी यावेळी केली.
@@AUTHORINFO_V1@@