‘खाविआ’चे नगरसेवक आ. भोळेंच्या संपर्कात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

मातब्बरांचा समावेश, भाजपमध्ये येण्यास इच्छूक

 
 
जळगाव, १२ एप्रिल :
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी गटात पडद्याआड अनेक नाट्यमय घडामोडी घडत असून, शहरात विकासकामे होत नसल्याच्या नाराजीतून मातब्बर नेते आणि काही नगरसेवक आ. सुरेश भोळे यांच्या संपर्कात आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक असल्याची माहिती मिळाली.
 
 
महापालिकेतील सत्ताधारी गटात असूनही प्रभागात अपेक्षित विकासकामे करता आलेली नाहीत. अशा स्थितीत येत्या निवडणुकीत मतदारांना कोणत्या तोंडाने सामोरे जायचे? अशा संकटात बरेच नगरसेवक आहेत. सत्ताधारी गटातील काही मोजक्या नगरसेवकांच्या प्रभागातच विकासकामे झाली असल्याची भावना काहींच्या मनात आहे. शहराच्या विकासावर भाजपचा भर आहे. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांचा, लोकप्रतिनिधींचा सतत पाठपुरावा सुरू असतो. यामुळेच विकास कामांसाठी २५ कोटी रुपये, महापालिका हद्दीत समांतर रस्त्यांसाठी १२५ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आ. सुरेश भोळे यांचा दुजोरा
आ. सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘ज्यांना भाजपची तत्त्वे, विचार मान्य असतील. पक्षाच्या चौकटीत काम करण्याची तयारी असेल त्यांच्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.’ मनपातील सत्ताधारी गटातील मातब्बरांसह काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या ‘तरुण भारत’ला मिळालेल्या माहितीला आ. भोळे यांनी दुजोरा दिला.
 
कार्युकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढला
जामनेर नपा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता संपादन केली. सर्वच्या सर्व २५ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. विरोधक नावालाही राहिलेले नाहीत. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे तर विरोधकांना राजकीय भविष्याच्या काळजीने ग्रासले आहे. याचाही परिमाम महापालिकेच्या येत्या निवडणुकीत बघायला मिळेल, असा अंदाज आहे
 
इच्छूक घेताहेत राजकीय स्थितीचा अंदाज
एकूणच राजकीय स्थितीचा अंदाज घेत खाविआतील मातब्बरांसह काही नगरसेवक आ. भोळे यांच्या संपर्कात आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. यातूनच ‘खाविआ’ फुटू नये म्हणून आघाडीच्या बड्या नेत्यांनी पुन्हा एकदा ‘युती’चा सूर लावत युध्दापूर्वीच तहाचा प्रस्ताव पुढे केला असल्याच्या शक्यतेला अधिक बळकटी मिळत आहे.
 
भाजपकडून कायमच सहकार्य
दुसरीकडे सत्ताधारी गटाने कायमच भाजपला विरोध केला असला, तरी पक्षाचे आ. सुरेश भोळे, खा. ए. टी. पाटील यांनी जळगाव शहराच्या विकासात सातत्याने पुढाकार घेतला. केवळ स्वपक्षाचे नव्हे तर सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांना देखील आ. भोळे यांनी खासदार व आमदार निधी मिळवून दिला. त्यामुळे काही अंशी तरी दिलासा या नगरसेवकांना मिळाला आहे.
केंद्रात, राज्यात आणि लवकरच मनपात
भाजपने ‘मायक्रो’ नियोजन करून स्वतःची स्थिती मजबूत केली आहे. जळगाव मनपात ‘मिशन ५० प्लस’चे लक्ष्य ठेवले आहे. आ. चंदुलाल पटेल यांनी जामनेर निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच्या सर्व ७५ जागांवर भाजपच, असा सूर छेडला आहे. निवडणुकीदरम्यान ‘१९ प्रभागात १९ बाहुबली’ हे भाजपच्या चाणक्यांचे सूत्र विरोधकांच्या मनात धडकी भरविणारे आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेला भाजप लवकरच जळगाव महापालिकेत सत्ता हस्तगत करण्याची चिन्हे आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@