जळगाव मनपात आता ‘जामनेर पॅटर्न’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

सर्वच्या सर्व ७५ जागांवर निवडून आणणार भाजपचे उमेदवार

 
 
जळगाव, १२ एप्रिल :
जामनेरच नव्हे, तर जळगाव महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील सर्वच्या सर्व ७५ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले जातील, असा दावा पक्षाचे विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केला.
 
 
जामनेर नगरपालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व २४ जागांवर भाजपचे उमेदवार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात निवडून आले आहेत. याशिवाय लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरही भाजपच्या उमेदवार साधनाताई गिरीश महाजन निवडून आल्या आहेत. या निकालाचे विशेष म्हणजे विरोधक नावालाही शिल्लक राहिलेले नाहीत. ‘२५-०’ असे संख्याबळ झाले आहे. भारतात अशा तर्‍हेचा कदाचित हा पहिलाच निकाल असावा, अशी माहिती आ. चंदुलाल पटेल यांनी दिली.
 
 
जळगाव महापालिका निवडणुकीतही ‘जामनेर पॅटर्न’ राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सर्वच्या सर्व ७५ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले जातील. ‘७५-०’ ही पक्षाची स्लोगनच राहील. जळगावमध्ये पक्षाला घवघवीत यश नक्कीच मिळेल, असे आ. पटेल यांनी सांगितले. जळगाव शहराचा विकास करण्यावर पक्षाचा भर आहे. जळगावचे पुढचे पालकमंत्री ना. गिरीशभाऊच राहतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@