राबडी देवींनी परत केली आपली 'सुरक्षा व्यवस्था'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |


पटना : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी तसेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सर्व सुरक्षा रक्षक सरकारला परत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आपल्या बरोबर द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत राबडी देवींनी आपली सर्व सुरक्षा व्यवस्था परत देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आपल्या कुटुंबियांबरोबर कसल्याही प्रकारचा घातपात झाल्यास त्याला गृहमंत्रालय जबाबदार असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

राबडी देवी यांनी नुकतेच या विषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून कळवले आहे. सरकारने २००५ लालू प्रसाद आणि त्यांच्या परिवारांचा सुरक्षेसाठी बीएमपी-२ कमांडो तैनात केले होते. परंतु लालू प्रसाद यांना अटक झाल्यानंतर केंद्र सरकारने या कमांडोची संख्या लगेच कमी केली, राबडी देवी यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच काल मध्यरात्री उरलेल्या कमांडोंची संख्या देखील कमी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकार आपल्या बरोबर द्वेषाचे राजकारण करत असल्याचे आणखी एक आरोप करत त्यांनी आपली उरलेले सर्व सुरक्षा रक्षक आणि इतर साहित्य परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापुढे आपल्याबरोबर काहीही घातपात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@