केडगाव हत्याकांड : शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |


मुंबई : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या अहमदनगरमधील केडगाव राजकीय हत्याकांड प्रकरणी आज शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी या मंत्र्याच्या शिष्टमंडळाने केलेल्या किरकोळ मागण्या मान्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसैनिकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही मान्य केली असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याने दिली.

अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्यानंतर या मुद्यावर शिवसेनेने रान उठवण्याचा प्रयत्न केला आहे. काल राज्य मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री, रामदास कदम, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने काही मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. या प्रकरणानंतर झालेल्या बंद दरम्यान शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे मुख्यमंत्र्यानी मान्य केले असल्याचे समजते. मात्र, यावेळी भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांना पक्षातून हकालपट्टी करण्याच्या मागणीला मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीही ठाम आश्वासन दिले नसल्याचीही माहिती सेनेच्या या मंत्र्याने दिली.
@@AUTHORINFO_V1@@