राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : भारताला प्रथमच मिळाले डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |

 
गोल्ड कोस्ट : श्रेयसी सिंगने डबल ट्रॅपमध्ये उत्तम कामगिरी करत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून दिले आहे. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हा विजय देशाच्या मानात एक तुरा रोवणारा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील हे १२ वे सुवर्ण पदक आहे.
 
 
आज दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय खेळाडूंनी पदकाची मालिका कायम राखत उत्तम कामगिरी केली आहे. ओम मिथवाल याने ५० मीटर पुरुष गटातून २०१.१ स्कोअर करत कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा डेनिअलला सुवर्ण तर बांगलादेशचा शकील अहमदला रजत पदक मिळाले आहे.

 
 
याचबरोबर भारतीय मुष्टीयोद्धा मेरीकोम देखील अंतिम फेरीत पोहोचली आहे. श्रीलंकेच्या अनुषा दिलरुक्षीला पराभूत करून मेरीकोमने आपले या राष्ट्रकुल स्पर्धेतील रजत पदक निश्चित केले आहे. सध्या मेरीकोम सुवर्ण पदक जिंकण्याची अर्थात अंतिम सामन्याची तयारी करत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@