ब्रिटनमध्ये साजरा होतोय 'नॅशनल समोसा विक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018   
Total Views |

 
ब्रिटनमधील नागरिकांना भारतीय खाद्य पदार्थांची भुरळ पडली आहे. तेथे दरवर्षी राष्ट्रीय बर्गर फेस्टिव्हल, पिझ्झा फेस्टिव्हल यांसारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तेव्हा राष्ट्रीय समोसा सप्ताह का आयोजित होऊ नये? असा प्रश्न रोमिल गुलझार या ब्रिटनस्थित भारतीय नागरिकाला पडला, आणि नॅशनल समोसा विकची संकल्पना पुढे मांडली, नव्हे !! तर ती ९ ते ११ एप्रिल २०१८ या कालावधीत ब्रिटनमध्ये साजरी होत आहे.
 
 
ब्रिटन मधील लेसेस्टर शहरात नॅशनल समोसा विकचे आयोजन सुरु आहे. तेथील विविध सहा शहरांनी देखील यात आपला सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमात विविध समोसाप्रेमी सहभागी होत असून, समोस्याचे नानविध प्रकार पाहायला मिळत आहे. 'मॅन वि. समोसा' अशा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
 
 
कशी सुचली संकल्पना ?
 
ब्रिटनमध्ये समोसा हा पदार्थ खूप मोठ्याप्रमाणात प्रसिद्ध होत आहे. विशेषतः दक्षिण आशियातून आलेले लोक समोसा हा मोठ्या प्रमाणात खायला पसंत करतात. त्याचबरोबर तेथील स्थानिकांमध्ये देखील याचे आकर्षण वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर रोमिल गुलझार यांनी समोसा विक साजरा करण्याची कल्पना मांडली. 'लेसेस्टर करी अवार्ड' या संस्थेतर्फे नॅशनल समोसा विकचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
समोस्याचा इतिहास

बऱ्याच वेळेला समोसा हा पदार्थ अस्सल भारतीय खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो. मात्र मुळात हा पदार्थ भारतीय नाही...! रोमिल गुलझार यांनी याबद्दल सविस्तर सांगितले आहे. समोसा हा पदार्थ १० व्या शतकात मध्य आशियामध्ये तयार करण्यात आला होता. तेथून व्यापाराला किंवा युद्धाच्या निमित्ताने जाणाऱ्या नागरिकांमुळे तो दक्षिण आशियात पोहोचला. हा पदार्थ सुरुवातीला मांसाहारी असला तरी देखील, भारतीय मातीत रुजल्यानंतर येथे तो शाकाहारी पदार्थ म्हणूनच लोकप्रिय झाला.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ येथे आजही समोसा अत्यंत लोकप्रिय आहे. आणि त्याची भुरळ ब्रिटेनच्या नागरिकांना देखील पडू लागली आहे.

 
 
 
यातून गोळा करणार मदत निधी
 
लेसेस्टर शहरात मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी समोसा विक्रीचे केंद्र उभे करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविण्यासाठीची योजना आखली गेली आहे. या कार्यक्रमातून मिळणारी रक्कम आरोग्य प्रकल्प आणि पोलीस मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी जास्तीत जास्त समोसे विकीत घ्यावे असे गुलझार यांनी आवाहन केले आहे.
 
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट समोसा

या कार्यक्रमातील सर्वाधिक नवीन आणि आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे, ते चिली बाबा रेस्टॉरंटने केलेला स्ट्रॉबेरी आणि चॉकोलेट समोसा. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटावे, असा हा प्रकार आहे. आम्ही आमचा स्वत:चा नवीन प्रकारचा समोसा यानिमित्ताने नागरिकांपुढे ठेवत आहोत. डेझर्ट प्रकारातील या समोस्यात चॉकलेट पेस्ट्री, कोकोनट, स्ट्रॉबेरी आणि बिस्किटस यांचा समावेश असतो, असे चिलीबाबा रेस्टॉरंटने सांगितले.
 
 
याचबरोबर चीलीबाबाने चिकन करी समोसा देखील तयार केला आहे. यात चिकन करी आणी बिर्याणी राईसचा समावेश असतो. हा प्रकार देखील अनेकांना आकर्षित करत असल्याची माहिती मिळते.
 
 
याशिवाय देखील अनेक प्रकारच्या समोशांची चव घ्यायाल मिळत आहे. अनेक लोक आपले अनुभव कथन या कार्यक्रमानिमित्त करत आहेत.
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@