अल्जिरियाच्या सैन्य विमानाला भीषण अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |

२०० हून अधिक नागरिक दगावल्याची भीती





अल्जियर्स :
उत्तर आफ्रिका खंडामध्ये वसलेल्या अल्जिरिया या देशाच्या सैन्य विमानाला आज एक भीषण अपघात झाला असून या अपघातात २०० हून अधिक नागरिक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अल्जिरिया सैन्य दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले असून विमानाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विशेष म्हणजे अल्जिरियाची राजधानी असलेल्या अल्जियर्स येथील सैन्य विमानतळापासून अवघ्या २० किमी अंतरावरच हा अपघात झाला आहे. अल्जियर्समध्ये असलेल्या बौफारिक येथील सैन्य विमानतळावर हे विमान उतरणार होते. त्यासाठी म्हणून वैमानिकाने बौफारिक विमानतळाशी संपर्क देखील साधला होता. परंतु संपर्कानंतर काहीच वेळात विमानतळापासून २० किमी अंतरावरच या विमानाला अपघात झाला. यावेळी या विमानामध्ये सैनिकांसह तब्बल २०० हून अधिक नागरिक प्रवास करत असल्याचे अल्जिरीयाच्या सैन्येकडून सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अल्जिरीया सैनिकांकडून तातडीने मदत पाठवण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@