रोहिंग्यांना हद्दपार करा; जम्मूतील नागरिकांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |


जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अनधिकृतपणे वस्ती करत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना जम्मू-काश्मीरमधून हद्दपार करण्यात यावे, यामागणीसाठी जम्मूमधील नागरिकांकडून आज 'जम्मू बंद'ची हाक देण्यात आली आहे. बंदबरोबरच अनेक ठिकाणी नागरिक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर देखील उतरले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

रोहिंग्या मुस्लिमांना त्यांच्या मायदेशी परत पाठवावे, तसेच कथुआ हत्याकांडाप्रकरणी लवकरात लवकर कारवाईसाठी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावे, या प्रमुख मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर बार काउन्सिल तसेच जम्मूतील काही सामाजिक संघटनांनी या बंदात सक्रीय सहभाग घेतला आहे. जम्मू नागरिकांनी देखील या बंदला पाठींबा देत, आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवले आहेत. काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी निदर्शन करत आहेत. हातामध्ये मागण्यांचे फलक तसेच तिरंगी ध्वज घेऊन बार काउन्सिलचे काही सभासद देखील रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तणाव वाढू लागला आहे. त्यामुळे जम्मू सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे.

म्यानमारमधून विस्थापित झालेले रोहिंग्या मुस्लीमांची भारतातील संख्याही दिवसेंदिवस वाढत निघाली आहे. विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये यांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे भविष्यात हे रोहिंग्या मुसलमान देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी घातक ठरू शकतील, असे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यावर लवकरात लवकर ठोस भूमिका घेऊन यांना भारतीय सीमेबाहेर काढावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@