पिक कर्जापासून एकही जण वंचित राहू नये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |

पालकमंत्री येरावार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश




यवतमाळ :
'खरीप हंगाम हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हंगाम आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगाम पिक कर्जयोजनेपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये', असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन भवनामध्ये आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज ते बोलत होते.

यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ९ लाख १० हजार हेक्टरवर पीक लागवड केली जाते. यासाठी खत, बियाणे आणि कर्जपुरवठा या तीन बाबी खरीप नियोजनासाठी अत्यंत महत्वाच्या असतात, असे ते म्हणाले. त्याच बरोबर यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी २ हजार ७८ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ५२३ कोटी, राष्ट्रीयकृत बँका १ हजार ३४१ कोटी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १५७ कोटी आणि खाजगी बँकांना ५५ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

याच बरोबर शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला. गेल्या वेळी जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करत असताना, अनेक शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे यंदा अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे, असे निर्देश देखील त्यांनी याबैठकीत दिले.
@@AUTHORINFO_V1@@