नाट्यगृहाच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 

 
 
 
नाट्यगृहाच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार
जळगाव, ९ एप्रिल
शहरातील बंदिस्त नाट्यगृहाचा महाराष्ट्रातील सर्वात भव्य नाट्यगृह असा नावलैकीक भविष्यात होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नाट्यगृहाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री महोदयांना लवकरच निमंत्रित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक नाट्य कलावंतास हेवा वाटेल, असे बंदिस्त नाट्यगृह जळगाव शहरात उभे राहिले आहे. हे नाट्यगृह बघून प्रत्येक नाट्य कलावंतास आपला नाट्यप्रयोग एकदा तरी जळगावच्या नाट्यगृहात सादर झाला पाहिजे, असे मनोमन वाटेल असे भव्यदिव्य बंदिस्त नाट्यगृह सर्व आधुनिक सोयींसह उभारले गेले असल्याचे कौतुक पालकमंत्र्यांनी केले.
सोमवारी सायंकाळी पालकमंत्र्यांनी महाबळ कॉलनी परिसरात बांधण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहास भेट देवून तेथील कामाची पाहणी केली. नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेले अभियंते व कंत्राटदराचे ना. पाटील यांनी उत्कृष्ट कामाबद्दल अभिनंदन केले. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, केशव स्मृती सेवासंस्था समुहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, उमवि सिनेट सदस्य दिलीप पाटील स्थानिक नगर सेविका यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती
महाराष्ट्रातील कलावंतांना हेवा वाटावा अशा पद्धतीचे नाट्यगृह
उत्कृष्ट कामाबद्दल केले कौतुक
 
 
@@AUTHORINFO_V1@@