चीन बनेल जागतिक अर्थकारणाचा केंद्र : शी जिनपिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |



बोआओ :
'चीनने नव्याने स्वीकारलेला धोरणांमुळे येत्या काही वर्षांमध्ये चीन हा जागतिक अर्थकारणाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणून नावारुपाला येईल' असा विश्वास चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज व्यक्त केला आहे. चीनच्या बोआओ येथे भरलेल्या बोआओ फोरम आशियान परिषदेमध्ये आज ते बोलत होते. यावेळी चीनची वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करत चीनची भविष्य अत्यंत उज्ज्वल असलायचे त्यांनी म्हटले.

'चीनने यावर्षी अनेक नव्या धोरणांचा स्वीकारला केला आहे. मेड इन चायना २०२५ या नव्या धोरणांतर्गत चीनने परदेश व्यापारासाठी देखील अनेक नवी धोरणे स्वीकारली आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये जागतिक अर्थकारण हे पूर्णपणे चीनच्या सोभावातली फिरणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये चीन हा जागतिक राजकारणाची 'अँकर की' म्हणून ओळख जाईल. तसेच जागतिक राजकारणाचा चालक म्हणून देखील चीनकडे पहिले जाईल' असा विश्वास शी यांनी यावेळी व्यक्त केला.



याच बरोबर चीनने जागतिक व्यापारासाठी तसेच नव्या उद्योगांसाठी चीनने स्वीकारलेल्या अनेक नव्या धोरणांची माहिती दिली. व्यापाराबरोबरच बँकिंग क्षेत्रासाठी देखील चीनने आपले दरवाजे सताड उघडी केली आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी आता चीनला प्राधान्य द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
@@AUTHORINFO_V1@@