होमिओपॅथी : सर्वांगसुंदर उपचार पध्दती !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
होमिओपॅथीचा शोध लागेपर्यंत पारंपरिक औषधशास्त्र अस्तित्त्वात होते, ते कोणत्याही पक्क्या सिद्धांतांवर आधारित नव्हते. त्यांचे सिद्धांत सतत बदलत राहिले. आताही त्यांचे कुठलीही ऋळुशव झीळपलळश्रिशी नाहीत. होमिओपॅथी मात्र पहिल्यापासूनच पक्क्या सिद्धांतांवर आधारित आहे व हे सर्व सिद्धांत नैसर्गिक आहेत.
 
 
होमिओपॅथीचे यश, उपयुक्तता व रूग्णांना होणारा फायदा लक्षात घेऊन, आता भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने ‘आयुष’ मंत्रालय स्थापन केले आहे आणि या मंत्रालयातर्फे होमिओपॅथीचा विकास होत आहे. होमिओपॅथीमधील संशोधनासाठी आयुष मंत्रालय सर्वतोपरी साहाय्य करीत आहे. इतकेच नव्हे, तर भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी होमिओपॅथीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली गेली आहे.
 
होमिओपॅथी जशी दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे, तसे काही लोकांमध्ये त्याबद्दल काही गैरसमजही निर्माण होत आहेत. सामान्य लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की, होमिओपॅथीच्या या छोट्याशा गोळ्या असाध्य रोगांवर कशा कार्य करणार? हे वाटणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत अनेक मोठमोठ्या गोळ्या, सिरप्स यांची सवय असलेल्या लोकांना असे वाटू शकते. पण, मी सांगू इच्छितो की, होमिओपॅथीमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त औषधे आहेत आणि ती निसर्गामधील उपयुक्त अशा गोष्टींपासून नैसर्गिकरित्या बनवली गेली आहेत. त्यामुळे अशा औषधांचे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत व ही औषधे जेव्हा पांढर्‍या गोळ्यांमध्ये घालून रुग्णाला दिली जातात, तेव्हा अत्यंत असाध्य असे आजारही बरे होतात.
 
 
 
होमिओपॅथीची औषधे ही इतर औषधशास्त्रांप्रमाणे प्राण्यांवर सिद्ध केली जात नाहीत, तर निरोगी लोकांवर सिद्ध केली जातात. म्हणूनच, होमिओपॅथीमध्ये माणसाच्या मन, बुद्धी आणि शरीराचा व्यवस्थित अभ्यास केला जातो.
औषधशास्त्राचा प्रणेता म्हणून हिपोक्रेटीसचे नाव घेतले जाते. याच हिपोक्रेटीसने असे नमूद करून ठेवले आहे की, औषधशास्त्र हे दोन नियमांवर आधारित आहे.
 
 
१) समानतेचा नियम- 
२) विषमतेचा/विरूद्धतेचा नियम -
 
 
होमिओपॅथी ही समानतेच्या सिद्धांतावर अवलंबून आहे आणि इतर औषधशास्त्रे विरूद्धतेच्या नियमावर काम करतात. होमिओपॅथीला म्हणूनच ‘समचिकित्सापद्धती’ असेही म्हटले जाते.
 
 
अजून एक गैरसमज लोकांमध्ये असा आहे की, होमिओपॅथी हे सिद्ध केलेले विज्ञान नाही. खरे तर असे मुळीच नाही. होमिओपॅथी हे औषधशास्त्र पूर्णतः वैज्ञानिक निकषांवर सिद्ध केलेले आहे. औषधे बनवण्याची पद्धतीसुद्धा पूर्णतः वैज्ञानिक आहे. हे औषधशास्त्र पूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित आहे. या शास्त्राचे नियम हे निसर्गाचे नियम असल्यामुळे त्यात बदल झालेला नाही. याच नियमांवर आधारित असल्यामुळे होमिओपॅथी गेली सव्वादोनशे वर्षे झपाट्याने फोफावते आहे. इतर औषधशास्त्रांप्रमाणेच या शास्त्राचाही साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम असतो. शरीरशास्त्र, शरीररचना व क्रियाशास्त्र , शल्यचिकित्सा, स्त्रीरोगशास्त्र , औषधनिदानशास्त्र हे सर्व विषय होमिओपॅथीमध्ये शिकवले जातात व सरकारमान्य पदवी विद्यार्थ्यांना मिळते. पदव्युत्तर उच्च शिक्षणाची सुविधाही होमिओपॅथीमध्ये आहे, ज्याने डॉक्टरांना होमिओपॅथीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर होता येते.
 
 
 
संपूर्ण भारतामध्ये होमिओेपॅथीची सरकारमान्य अशी दोनशेपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत व या महाविद्यालयातून दरवर्षी हजारो होमिओपॅथिक डॉक्टर्स भारतात सेवा देत आहेत.
 
- डॉ. मंदार पाटकर 
 
 
@@AUTHORINFO_V1@@