आरोग्य तपासणीचे महत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
खरेतर काही त्रास नसल्यास सहसा बरेच जण वैद्यकीय चाचण्या करीत नाहीत. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. एकतर अवेअरनेस नसणे, तपासणीचा कंटाळा, काही आजार तर निघणार नाही नां? याची भीती वगैरे वगैरे. परंतु एखाद्या होतकरू प्रतिष्ठीत व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे परिवारजन, मित्रमंडळी व सर्व समाजातील मंडळी हळहळते. त्यामुळे अकस्मातमृत्यूची महत्त्वाची कारणे कोणती याबद्दल समाजामध्ये थोडीफार जागृती करणे गरजेचे वाटते.

माझ्या ५० वर्षांच्या वैद्यकीय सेवेच्या अनुभवातून चरीीर्ळींश उरीवळरल ईंींरलज्ञ हे महत्त्वाचे कारण आहे. असा हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येण्यामागे काही दृश्य तर काही अदृश्य कारणे असतात. यातील दृश्य कारणांमध्ये स्थूलपणा , शारीरिक श्रमानंतर छाती भरून येणे (एुींशीपरश्र वूीपिळर) किंवा थोडा वेळ छाती दुखणे आणि विश्रांतीनंतर बरे वाटणे (अपसरळपश शिींर्शींळी) परंतु काही कारणे वरून दिसत नाहीत, म्हणून बरीच मंडळी गाफील, अनभिज्ञ राहतात. त्यात महत्त्वाची काही कारणे अशी सांगता येतील.
 
१. उच्च रक्तदाब, २. मधुमेह, ३. हाय कोलेस्ट्रॉल
 
काही त्रास नसल्यास वरील आजारांची आपण तपासणी करीत नाही. अगदी सुरुवातीलाच ही कारणे कळल्यास वेळीच त्यांचे निरसन करता येते आणि पुढील येणारा संभाव्य धोका टाळता येतो. आजच्या परिस्थितीत रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण पहिल्यापेक्षा अधिक वाढलेले आढळून येते. त्याची कारणे देखील आहेत. त्यात साधारणपणे बदललेली जीवनशैली, खाण्या-पिण्यातील बदल, नियमित व्यायामाचा अभाव, वाढती स्पर्धा, तणावपूर्ण जीवन (स्ट्रेसफूल लाईफ) यांचा समावेश आहे.
दैनंदिन कामात व्यक्तीला कळतदेखील नाही की, आपल्याला रक्तदाब किंवा मधुमेह आहे. सुरुवातीला या आजारांचे लक्षण तेवढे तीव्र नसते आणि मुद्दामहून तपासण्या केल्या जात नाहीत. परंतु, वैद्यकीय नियमानुसार ३० ते ४० वयानंतर वर्षातून एकदा शारीरिक तपासणी आणि आवश्यक असणार्‍या चाचण्या करणे गरजेचे आहे. या तपासणीअंती काही दोष आढळल्यास योग्य वेळेत उपचार सुरू करता येईल आणि पुढचा संभाव्य मोठा धोका टाळता येईल. या दृष्टीने साधारणतः पुढीलप्रमाणे तपासण्या केल्या तर आपल्याला असलेल्या आजाराची माहिती मिळून वेळेत उपचार करणे शक्य होईल. या तपासण्यांमध्ये शारीरिक तपासणी, ई.सी.जी., एक्स-रे, बी-वन शुगर आणि युरिन शुगर आदींचा समावेश आहे. 
- डॉ.के.डी.पाटील (एम.डी.) 
 
@@AUTHORINFO_V1@@