आम्ही आहोत पुन्हा विद्यार्थी झालेले डॉक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री गिरीश महाजन, डॉ. उल्हास पाटील व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला ‘मॉडर्न फार्माकॉलॉजी’ हा एक वर्षाचा कोर्स आहे. वैद्यकीय सेवा करणार्‍या डॉक्टरांसाठी आणि रुग्णांसाठी तो उपयुक्त ठरत आहे.
 
वय वर्ष ३० ते ७०, सर्व विद्यार्थी सकाळी ९ वाजता वर्गात शिरतात. संध्याकाळी ५ वाजता बाहेर पडतात. लेक्चर, प्रॅक्टीकल, हॉस्पिटल व्हिजिट. सर्व काही शिस्तीत पण हे विद्यार्थी कोण? हे विद्यार्थी आहेत - जळगाव, विदर्भ, मुंबई, मराठवाडा या भागांमधील प्रथितयश डॉक्टर आणि हा वर्ग भरतो जळगावच्या नामांकित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये. आठवड्यातून दोन दिवस, शुक्रवार आणि शनिवार.
 
 
शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम सुरू असतात. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने यात पुढाकार घेतला. खेड्यापाड्यातील गरीब रूग्णांसाठी आधुनिक उपचार पध्दतीचा वापर होण्यासाठी विद्यापीठाने ‘आधुनिक वैद्यकीय औषधी शास्त्र (मॉडर्न फार्माकॉलॉजी)’ या कोर्सची सुरूवात केली. जळगावला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा नेहमीच आग्रह धरणारे डॉ. उल्हास पाटील व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांनी तत्काळ कार्यवाही केली आणि ‘मॉडर्न फार्माकॉलॉजी’ हा कोर्स जळगावात नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झाला.
 
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री गिरीश महाजन, डॉ. उल्हास पाटील व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा एक वर्षाचा कोर्स आहे. आमच्यासारख्या वैद्यकीय सेवा करणार्‍या डॉक्टरांसाठी आणि रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. या बॅचमध्ये नियमित प्रवेशप्रक्रिया होऊन विविध वयोगटांतील ५० डॉक्टरांनी प्रवेश घेतला आहे.
 
 
कितीतरी वर्षानंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये, वर्गामध्ये विद्यार्थ्यांसारखे बसून शिकायचे या कल्पनेने सुरूवातीला आमच्यासारख्या डॉक्टरांना नवलाई आणि थोडी भीतीही वाटली. मात्र डॉ. उल्हास पाटील यांनी पहिल्या दिवशी स्वतः उपस्थित राहून आम्हाला धीरही दिला आणि प्रोत्साहनही दिले. आम्हाला शिकवणारे सर्व डॉक्टर आणि शिक्षकवृंद अवघड विषयही सोप्या व साध्या भाषेत, न कंटाळता समजावून सांगतात. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आमचे त्यांच्याशी अतूट नाते तयार झालेले आहे.
आम्ही सर्व डॉक्टर आपापली प्रॅक्टीस सांभाळून मॉडर्न फार्माकॉलॉजीचे शिक्षण घेत आहोत. पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस एन्जॉय करीत आहोत. अर्थात या सर्व ज्ञानाचा उपयोग सर्व स्तरातील रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात आहे. हा कोर्स जळगावला सुरू करून आम्हाला ज्ञानार्जनाची संधी दिली. त्याबद्दल डॉ. उल्हास पाटील यांचे आभारी आहोत.
 
 
- भावना
@@AUTHORINFO_V1@@