पर्यटनमंत्री जयकुमार रावल काढणार ५० किमीची पदयात्रा, उद्यापासून प्रारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

५ दिवसांच्या पायी प्रवासात बुराई नदीकाठच्या गावांत साधणार जनसंवाद

 

 
मुंबई : राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल हे त्यांच्या धुळे जिल्ह्यात तब्बल ५४ किमीची पदयात्रा काढणार असून उद्या बुधवार दि. ११ एप्रिलपासून या पराई नदीवर माथा ते पायथा साठवण बंधारे बांधण्याच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने रावल ही पदयात्रा काढत असून या प्रवासादयात्रेचा प्रारंभ होत आहे. शिंदखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या बुदरम्यान ते बुराई नदीकाठच्या गावांतील लोकांशी संवादही साधणार आहेत.
 
या साठवण बंधारे प्रकल्पांमुळे आसपासच्या गावांची पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. केवळ पावसाळ्यातील चार महिने वाहणाऱ्या व उर्वरित आठ महिने कोरड्या असणाऱ्या या बुराई नदीवरील बंधारे प्रकल्पांसाठी जयकुमार रावल यांनी सातत्याने पाठपुरावा करून जवळपास २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. साठवण बंधाऱ्यांद्वारे बुराई नदीतून वाहून जाणारे पाणी अडवण्यात येवून एका बंधाऱ्यांचे पाणी दुसऱ्या बंधाऱ्यापर्यंत राहील. या प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमानिमित्ताने स्वतः मंत्री जयकुमार रावल यांनी बुराई नदीची पायी दिंडी करण्याचा निर्णय घेतला आहे
 
बुधवार दि. ११ एप्रिलपासून या 'बुराई परीक्रमा' दिंडीला प्रारंभ होत असून या भागातील दुसाणे, वरसुस या गावांदरम्यान ५४ किमीच्या प्रवासात ते जवळपास २५ गावांना भेट देणार आहेत. ५ दिवसांची ही पदयात्रा असून यावेळी ते रात्रीचा मुक्कामही याच वाटेतील ४ गावांमध्ये करणार आहेत. या पदयात्रेत विविध ठिकाणच्या बंधारे प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यासोबतच पाण्‍याविषयी समाज प्रबोधन, जनजागृतीचे कार्यक्रमही रावल यांनी आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांना काही जलतज्ज्ञ, समाजसेवकही उपस्थित राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या तापी नदीप्रमाणेच बुराई नदीला बारमाही करण्याचा संकल्प रावल यांच्या या पदयात्रेतून करण्यात येणार आहे. या नदीवर बांधण्यात येणाऱ्या ३४ बंधाऱ्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेशही प्रशासनाला वितरीत करण्यात आले आहेत. येत्या पावसाळयाच्या आत ही कामे पूर्ण होण्याचा दावाही सरकारने केला आहे. रविवार दि. १५ रोजी शिंदखेडा येथे रावल यांच्या या पदयात्रेचा समारोप होईल.
@@AUTHORINFO_V1@@