शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : ती एक भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

 
 
आपल्या रोजच्या आयुष्यात मित्र मैत्रीणींमध्ये, आपल्या सर्कल मध्ये आपण किती तरी जोडीदार बघतो. एकेकाळी एकत्र असलेले, आणि आता ब्रेकअप झालेले देखील अनेक मित्र आपण बघितलेच आहेत. ही कहाणी आहे अशाच एका कपलची, जे एकेकाळी एकत्र होते. मात्र आता.... त्यांचे मार्ग वेगवेगळे झालेले आहेत. समर आणि इशानाची ही कहाणी.
 
समर एक बिझनसमन आणि इशाना एक पटकथालेखिका. हे झालं आताचं. २ वर्षांआधी ते एकत्र होते. एचदिवस समर काही काम करत असताना त्याला अचानक इशानाचा फोन येतो. "मी पुण्यात आलेय आपण भेटू शकतो का?" असे ती विचारत असताना समरच्या डोळ्यांपुढे त्या सगळ्या जुन्या आठवणी अचानक येतात. आणि एका तासात चहासाठी भेटायचं असं ठरतं. ते भेटतात. काय घडतं या भेटीत? काय होतं.? दोघं पुन्हा एकत्र येतात का? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.
 
 
 
 
समर जेव्हा इशानाविषयी सांगत असतो, त्यावेळी प्रेक्षकांमध्ये त्यांच्या भेटीविषयी उत्सुकता निर्माण होते. तसंच भेटीनंतर इशाना जे समर विषयी आणि एकूणच प्रेम आणि नात्याविषयी बोलते ते देखील खूप विचार करायला लावणारं आहे. एकूणच आज नाती खूप टिकत नाहीत असं दिसतं. त्यामागे कारणंही अनेक आहे. मात्र या नात्यांमधून आपण काय शिकतो हे महत्वाचं आहे.
 
या लघुपटात सौरभ केतकर आणि विभावरी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर मनाली तेंडुलकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघुपटाला यूट्यूबवर तील लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. एका सुंदर नात्याची झलक बघण्यासाठी एकदा तरी हा लघुपट नक्की बघावा.
 
- निहारिका पोळ 
@@AUTHORINFO_V1@@