प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

भाजपचे ९ तर शिवसेनेचे ८ जागा लढविणार

 
 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी १२, १३ व १९ एप्रिलला निवडणुक होणार असून यासाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही सेना - भाजपा युती होणार आहे.
 
१७ प्रभाग समित्यांपैकी ९ जागा भाजप तर ८ जागा शिवसेना लढवणार आहे. १७ पैकी १६ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्यात आले.तर एका प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी १६ एप्रिल रोजी अर्ज भरण्यात येणार आहे.
 
१२ एप्रिल रोजी ए, बी आणि ई, सी आणि डी, एफ /उत्तर आणि एफ /दक्षिण, जी/दक्षिण, आर /मध्य आणि आर /उत्तर, आर /दक्षिण, पी /उत्तर, पी/ दक्षिण , १३ एप्रिल रोजी जी /उत्तर, एच /पूर्व आणि एच /पश्चिम, के/ पूर्व, के /पश्चिम, एम /पश्चिम, एल, एन, एस आणि टी आणि १९ एप्रिल रोजी एम (पूर्व ) ची निवडणुक होणार आहे.
 
सध्या १७ पैकी ८ प्रभाग समित्या भाजपाकडे, एक प्रभाग समिती भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय सेनेकडे तर शिवसेनेकडे ६ प्रभाग समित्या असून एक प्रभाग समिती शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेकडे होती. सहा महिन्यांपूर्वी मुंबई मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांची कुर्ल्याच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून सुधार समितीच्या अध्यक्ष पदावर विराजमानही झाले आहेत. त्यामुळे एल विभागाची प्रभाग समिती शिवसेनेकडे राहणार आहे तसेच मनसेतून घाटकोपर येथील दोन नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्याने एन विभागाची प्रभाग समितीही शिवसेनेकडेच राहण्याची शक्यता आहे.
 
प्रभाग समिती अध्यक्षपदाचे उमेदवार (प्रभाग - पक्ष - उमेदवार)
 
 
१) ए, बी, इ - भाजप गीता गवळी
 
२) सी, डी - भाजप अतुल शहा
 
३) एफ /दक्षिण व एफ /उत्तर शिवसेना सचिन पडवळ
 
४) जी/ दक्षिण - शिवसेना किशोरी पेडणेकर
 
५) जी / उत्तर - शिवसेना मारिअम्मल मुत्तूतेवर
 
६ ) एच /पूर्व व एच /पश्चिम - शिवसेना सदा परब
 
७ ) के/ पूर्व - भाजप सुनील यादव
 
८) के /पश्चिम - भाजप योगीराज दाभाडकर
 
९) पी /दक्षिण - भाजप संदीप पटेल
 
१०) पी/ उत्तर - भाजप जया तिवाना
 
११) आर /दक्षिण - भाजप शिवकुमार झा
 
१२ ) आर/ मध्य व आर/ उत्तर - शिवसेना रिद्धी खुरसंगे
 
१३ ) एम /पूर्व - शिवसेना निधी शिंदे
 
 १४ ) एम /पश्चिम - भाजप राजेश फुलवारीया
 
१५) एस आणि टी - भाजप सारिका पवार
 
१६) एल - शिवसेना किरण लांडगे
 
१७) एन - शिवसेना रुपाली आवळे
 
@@AUTHORINFO_V1@@