पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार १२ एप्रिलला उपोषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा १२ एप्रिल रोजी उपोषण करणार असल्याचे आज त्यांनी जाहीर केले आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काँग्रेसने उधळून लावले. या विरोधात पंतप्रधान आणि अमित शहा उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या या निर्णयाला भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. 
 
 
 
 
 
भारतीय जनता पक्षाने देश पातळीवर उपोषणाची घोषणा केली आहे. १२ एप्रिल रोजी देश पातळीवर हे उपोषण आयोजित करण्यात आले आहे. दिल्ली येथे पंतप्रधान आणि अमित शाह एकत्र उपोषणाला बसणार आहेत.
 
दरम्यान काँग्रेसतर्फे भाजपच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. संसदेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ठेवलेल्या चहापानालाही काँग्रेसने उपस्थिती लावली नाही. तसेच संसदेतील गोंधळ सरकारला नीट हाताळता आला नाही, असा आरोप काँग्रेसने केला.
त्यामुळे या उपोषणादरम्यान आता काय होते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@