देशाच्या पहिल्या स्वयंचलित विद्युत ट्रेनचे मोदींच्या हस्ते अनावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

 
 
मोतीहारी (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या पहिल्या स्वयंचलित(लोकोमोटीव्ह) विद्युत ट्रेनचे उद्घाटन झाले आहे. कटीहार ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी ही ट्रेन हमसफर एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. मेक इन इंडियाच्या अंतर्गत विकसित केलेले हे रेल्वे इंजिन तब्बल १२ हजार हॉर्सपॉवर एवढ्या शक्तीचे आहे.
 
 
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात ट्वीट करताना लिहिले आहे की, देशाचे पहिले १२ हजार हॉर्सपॉवर असलेले विद्युत रेल्वे इंजिनचे अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. मधेपुरा येथील रेल्वे इंजिन कारखान्यातील सर्वांना याचे श्रेय जाते. मधेपुरा कारखान्याने देशाला हे इंजिन दिले आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, आर्थिकदृष्ट्या देखील देशाला फायदा झाला आहे.
 
 
 
दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत सांगण्यात आले की, या प्रकल्पाला २००७ साली मंजुर करण्यात आले होते, मात्र पुढील ८ वर्षे सर्व कागदपत्रे धूळ खात पडली होती, रालोआ सरकार आल्यानंतर गेल्या ३ वर्षात आम्ही या प्रकल्पाला गती देऊन कार्य तडीस नेले, असल्याचे स्पष्ट केले गेले.
 
 
या ट्रेनच्या उद्घाटनापूर्वी भारतात ६ हजार हॉर्सपॉवर क्षमतेचे रेल्वे इंजिन सर्वाधिक शक्तिशाली मानले जात असे. मात्र या ट्रेनच्या उद्घाटनानंतर त्याची क्षमता दुप्पट झाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@