पाणी चोरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा अशक्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

आयुक्तांनी केले स्पष्ट

 
 
 
मुंबई :  त्यामुळे अनधिकृत जलजोडणीची शहानिशा करता येत नसल्याने जल वाहिनी फोडणे, पाण्याची विक्री, पाण्याचा दुरुपयोग करणे अजामीनपात्र गुन्हा ठरविता येणार नाही, असे आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या अभिप्रायात स्पष्ट केले आहे.
 
मुंबई महानगरपालिका मुंबईबाहेरच्या तलावातून पाणी आणून येथील नागरिकांस पुरविते. परंतु काही समाजकंटक जलवाहिन्या फोडतात पाण्याचा दुरुपयोग करतात अशा व्यक्तींवर वीज चोरी जसा अजामीनपात्र गुन्हा आहे त्या धर्तीवर पाणी चोरी हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यासाठी पाठपुरावा करावा. त्यामुळे पाणीचोरी आणि पाण्याचा दुरुपयोग याला आळा बसेल अशी ठरावाची सुचना तत्कालीन नगरसेवक अरविंद दुधवडकर १३ जुलै रोजी २०१५ रोजी मांडली होती. त्यावर आयुक्त अजोय मेहता यांचा अभिप्राय आला असून हा माहितीसाठी प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात येणार आहे.
 
आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे कि तानसा, मोडकसागर, हिंदू हृदयसम्राट शिवसेना बाळासाहेब मध्य वैतरणा जलाशय, अप्पर वैतरणा व भातसा धरणातून पाणी जलाशयात आणले जाते. जलाशयातून वितरण व्यवस्थेत पाणीपुरवठा करण्यात येतो परंतु येथील जलवाहिन्या मोठ्या असल्यामुळे आणि पाण्याचा दाब उच्च असल्यामुळे या जलवाहिन्यांवर अनधिकृत जोडण्या नाहीत. तर २००० अनधिकृत झोपडयांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनधिकृत जल जोडण्याचे प्रमाण कमी होईल. असेही त्यानी म्हटले आहे. तर अनधिकृत जलजोडण्या झोपडपट्यामध्ये भूमिगत व अरुंद गल्ल्यामध्ये असल्यामुळे व पालिकेच्या जवाहिन्यांपासून दूर गल्ल्यामध्ये असतात. त्यामुळे त्याची जोडणी करता येत नाही.
 
शहानिशा करण्यात अडथळा
 
अजामीनपात्र गुन्हा ठरविण्याची तरतूद करताना महापालिका प्रशासनाला महाराष्ट्र शासनाची मंजुरी घावी लागते. हि मंजुरी मिळाल्यांनतर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरविण्याची तरतूद नंतर नक्की कोणी हे अनधिकृत काम केले आहे त्याची शहानिशा करणे शक्य नाही. त्यामुळे अंमलबजावणी करता येणार नाही असे आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@