भारतीय उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचे विशेष प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने व्यवसायाच्या सुलभीकरणासाठी विशेष योजना तयार केली आहे. त्याचबरोबर रेल्वेला आवश्यक असणाऱ्या सामुग्रीला पुरवठा करण्यासाठी भारतीय उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रेल्वेच्या ‘रिसर्च डिझाईन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ)’ या संस्थेच्या वतीने देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्योजकांच्या बैठका घेतल्या आहेत. माल पुरवठादारांसाठी रेल्वेने एक नवीन सुलभ ऑनलाईन नोंदणी कार्यप्रणाली तयार केली आहे. या कार्यप्रणालीची माहिती या बैठकांमध्ये उद्योजक, माल पुरवठादारांना देण्यात आली.
 
रेल्वे मंत्रालयाने पुणे, मुंबई यांच्यासह चौदा विविध शहरांमध्ये या बैठका घेतल्या. उद्योजकांच्या काही समस्या तर यावेळी तातडीने सोडवण्यात आल्या. व्यवसायाच्या सुलभीकरणाच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने कार्यपद्धती अधिक सोपी, सुटसुटीत केली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
 
याच पद्धतीने आता रेल्वे मंत्रालय एप्रिल अखेरच्या सहा दिवसात रायपूर, पाटणा, जयपूर आदी शहरांतील उद्योजकांशी संवाद साधणार आहे तर मुंबई येथे ४ मे २०१८ रोजी आरडीएसओचे अधिकारी बैठक घेणार आहेत.पुण्यातल्या ४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीला ११० उद्योजक, मालपुरवठादार सहभागी झाले होते, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@