राष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाज हीना सिद्धू हीला सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |




गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) :
भारतीय नेमबाज हीना सिद्धू हिला २५ मीटर एयर पिस्तूल क्रिडा प्रकारात सुवर्ण पदक मिळाले आहे. २८ वर्षीय सिद्धू हिने ऑस्ट्रेलियाच्या एलिनाला हरवत ३८ गुण मिळवून ह्या पदकावर आपला नाव कोरले आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिना सिद्धूला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.




भारताच्या पदक तालिकेत ११ तर नेमबाजीत तिसरे सुवर्ण पदक भारताला मिळाले आहे. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारताला आत्तापर्यंत ११ सुवर्ण, ४ रजत आणि ५ ब्रॉंझ पदक मिळाली आहेत. ह्या संख्येने भारत पदक तालिकेत ३ स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.




काल झालेल्या बॅडमिंटन मिश्र खेळामध्ये भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळाले होते. तसंच जितू राय ह्याला १०० मी. एयर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळाले होते.
@@AUTHORINFO_V1@@