विशेष समित्यांची अध्यक्षपदासाठी १६ व १७ एप्रिल रोजी निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जाहीर

 
 
मुंबई : मुंबई महापालिकेतील सहा विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी येत्या १६ व १७ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून भाजप यावेळीही या निवडणुका लढवणार नाही. त्यामुळे सर्व ही सर्व अध्यक्षपदेही शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे.
 
वैधानिक समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेसने उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध झाल्या त्याप्रमाणे या विषेश समित्यांच्या निवडणुकीतही काँग्रेसने उमेदवार न दिल्यास या निवडणुकाही बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. येत्या १२ व १३ एप्रिल रोजी या सहा विशेष समित्यांच्या अध्यक्ष पदांसाठी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या सहा विशेष समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली.
 
मनसेतून शिवसेनेत आलेल्या अर्चना भालेराव यांना सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षपदासाठी स्मिता गावकर यांना, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष पदासाठी हाजी अली खान यांना, विधी समिती अध्यक्ष पदासाठी अॅड. संतोष खरात यांना, स्थापत्य समिती अध्यक्ष पदासाठी (शहर) अरुंधती दुधवडकर यांना, स्थापत्य समिती अध्यक्ष पदासाठी (उपनगरे) साधना माने यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@