चंपारण सत्याग्रह : एक ऐतिहासिक घटना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
चंपारण (बिहार) : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या चंपारण येथे दाखल झाले आहेत. चंपारणच्या प्रसिद्ध सत्याग्रहाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज बिहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छतेविषयी आपले विचार व्यक्त केले. सोबतच चंपारण सत्याग्रहाचे देशाच्या इतिहासात असलेले महत्व त्यांनी या ठिकाणी सांगितले. मात्र आजच्या पिढीला, अनेकांना चंपारण सत्याग्रह म्हणजे काय याची पूर्ण माहिती नाही. आज आपण इतिहासातील या महत्वाच्या सत्याग्रहाबद्दल जाणून घेवू.
 
 
 
 

भारताच्या इतिहासातील पहिले सत्याग्रह :

चंपारण सत्याग्रह बिहारच्या मोतीहारी येथे १९१७ मध्ये चंपारण या ठिकाणी महात्मा गांधी यांनी मोठा सत्याग्रह केला. भारतातील या पहिल्या सत्याग्रहाला "चंपारणचा सत्याग्रह" या नावानी ओळखले जाते. याठीकाणची जमीन खूप सुपीक होती. मोठ्या प्रमाणात शेतीला वाव होता. मात्र येथे शेतकऱ्यांना नीळची शेती करण्याचे अंग्रेजांचे आदेश होते. इंग्रज शेतकऱ्यांचे शोषण करायचे. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते. एप्रिल १९१७ मध्ये चंपारण येथील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राजकुमार शुक्ला यांनी महात्मा गांधींना चंपारण येथे येण्याचे आमंत्रण दिले. महात्मा गांधी यांनी शेतकऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित झाले. आपल्या समस्या त्यांनी गांधी यांना सांगितले. शेतकऱ्यांच्या मोठ्या संख्येला बघत पोलिसांनी महात्मा गांधींना चंपारण सोडण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी गांधी यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले मात्र शेतकऱ्यांची संख्या बघता न्यायालयाने सुनावणी न करताच गांधींचा जामीन मंजूर केला.





 इंग्रजांनी केवळ शेतकऱ्यांवर अत्याचारच केले नव्हते तर चंपारण या गावाला जाणून बूझून अतिशय घाण ठेवले होते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोग-राई पसरत होती. महात्मा गांधी यांनी न्यायालयाला कायद्यानुसार कारवाई करण्यास मागणी केली, तसेच चंपारण न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी येथे स्वच्छतेविषयी जागरुकता पसरवली. चंपारण सत्याग्राहाला १० एप्रिल रोजी सुरुवात झाली. यामध्ये डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ अनुग्रह नारायण सिंह, आचार्य कृपलानी, बृजकिशोर, महादेव देसाई, नरहरि पारिख आदी लोकांचा मोठा सहभाग होता. तसेच चंपारणचे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात या सत्याग्रहात सामिल झाले.

 हळू हळू चंपारण विषयी संपूर्ण भारताला समजले. सरकारला अखेर आपले गुडघे टेकावे लागले. आणि कायदा करावा लागला. तसेच एक तपास समिती देखील नेमण्यात आली. चंपारण येथे सुरु असलेल्या सर्व कुप्रथांना कायद्याच्या चौकटीत घालत संपविण्यात आले. नीळची शेती करण्याचा बळजबरीपणा देखील संपविण्यात आला. आणि अशा पद्धतीने महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचे पहिले सत्याग्रह चंपारण येथे उभे केले.

  
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त चंपारण येथे उपस्थित होते. त्यामुळे या सत्याग्रहाच्या कथेची पुन्हा एकदा उजळणी झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वकील, अभियंता, वैद्य, शिक्षक, श्रमिक आणि शेतकरी यांना सगळ्यांना एकसमान दर्जा दिला. स्वच्छतेचे दूत म्हणून देखील आपला असाच सहभाग असायला हवा तसेच स्वच्छतेचा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा असा आपला प्रण असावा असे मोदी यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
भारताच्या इतिहासातील अशा अनेक घटनांमुळे भारतातील अनेक गावांना, अनेक स्थळांना ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे. चंपारण देखील त्यातीलच एक. 
@@AUTHORINFO_V1@@