सुंदरबनी सेक्टर येथे दोन जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |


जम्मू-काश्मीर : जम्मूमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानी सैनिकांनी आज पुन्हा एकदा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामध्ये दोन भारतीय जवान शहीद झाले असून पाकिस्तानकडून होणारा गोळीबार अजून देखील सुरु आहे. त्यामुळे भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.

आज पहाटेच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरजवळ असलेल्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून अचानकपणे हल्ला करण्यात आला. चौक्यांवर तैनात भारतीय सैनिकांना लक्ष करूनच हा हल्ला करण्यात आला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले आहे, त्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. यावर भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अजून तरी शहीद झालेल्या जवानांची नावे सेनेकडून जाहीर करण्यात आलेली नाहीत.

दरम्यान गेल्या आठवड्यामध्ये देखील पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला होता. पाकिस्तान केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये भारताचा २० वर्षीय जवान शुभम मस्तपुरे हा शहीद झाला होता.
@@AUTHORINFO_V1@@