जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश, सात दहशतवादी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान भागात आज सकाळी सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती लागले आहे. आज सुरक्षा रक्षकांनी सात दहशतवाद्यांना ठार केले असून एका दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान भागात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात  झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांना हे यश मिळाले आहे. अनंतनाग भागात एक तर शोपियान भागात सात दहशतवाद्यांना ठार केले आहे. एकूण आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे. 
 
 
 
 
तसेच आज सकाळपासून जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात देखील दहशतवाद्यांकडून गोळीबार केला जात आहे या गोळीबारात एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. या रक्षकावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमधील काही महत्वाच्या भागात दहशतवाद्यांकडून सारखाच गोळीबार केला जात आहे यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना २४ तास सतर्क राहावे लागत आहे.
 
 
 
 
काल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या अज्ञात दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस अधिकारी शहीद झाले होते. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@