डोकलामनंतर आता वॉलाँग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018
Total Views |

भारत-चीन-म्यानमार सीमेवर भारतीय सैन्य तुकड्यांमध्ये वाढ





वॉलाँग :
डोकलाम येथील सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या वादानंतर आता भारताने भारत-चीन आणि म्यानमार यांच्या सीमेला लागून असलेल्या वॉलाँग येथे भारतीय सैन्येची कुमक वाढवण्यास सुरुवात केली आहे. डोकलाम सारखी परिस्थिती वॉलाँग येथे उद्भवू नये, यासाठी भारतीय लष्कर सध्या याठिकाणी अधिक लक्ष देत असून याठिकाणी लष्कराच्या तुकड्यांमध्ये वाढ करण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय लष्कराचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने भारत आणि भूटान यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या डोकलाम पठारावर आपला ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला होता. परंतु भारताने याठिकाणी प्रखर विरोध केल्यामुळे चीन सध्या तडफडत आहे. त्यामुळे सध्या त्याचे लक्ष अरुणाचल प्रदेश आणि त्यांच्या आसपासच्या भागावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत-चीन आणि म्यानमारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वॉलाँग येथे डोकलामसारखी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून भारताकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये चीन सिक्कीमजवळील डोकलाम येथील पठारावर आपला मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताने भूटानच्या मदतीने चीनचा हा डाव उधळून लावला होता. यानंतर गेल्या महिन्यात चीनने पुन्हा एकदा याठिकाणी आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराने याठिकाणी आपली कुमक वाढवण्यास सुरुवात केली आहे. तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून याठिकाणी देखील सैन्य कुमक वाढवण्यास सुरुवात केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@