सीबीएसई पेपर लीक : दिल्ली पोलिसांची तिघांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018
Total Views |


नवी दिल्ली : केंद्रीय माधामिक शिक्षण बोर्डच्या (सीबीएसई) पेपर फुटीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज तिघांना अटक केली आहे. यामध्ये दिल्लीतील एका कोचिंग क्लासेस संचालक आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून या तिघांचीही अधिक चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेपरच्या १५ ते २० मिनिटे अगोदर अटक करण्यात आलेल्या या शिक्षकांनी पेपरचे फोटो काढून या खासगी कोचिंग क्लासेसच्या मालकाला पाठवले होते. यानंतर कोचिंग क्लास मालकाने हे फोटो आपल्या विद्यार्थांना पाठवले होते. याचबरोबर पेपरचे एक हस्तलिखित देखील सोशल मिडीयावर त्यावेळी व्हायरल होत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. यासंबंधी अधिक तपास केला जात असून मूळ पेपरचे हस्तलिखित तयार करणाऱ्या गुन्हेगाराला देखील लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान यासाठी पोलिसांनी आतापर्यंत ६० हून अधिक नागरिकांची चौकशी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच काही व्हॉटस्अॅप ग्रुपची देखील चौकशी सुरु असून काही संशयिताची देखील चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दिल्लीबरोबरच बिहारमध्ये देखील यासंबंधी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@