सिब्बल, संघवी आणि तनखा यांना सर्वोच्च न्यायालयात 'नो एन्ट्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018
Total Views |

 बार काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय
सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत हजर राहण्यास मनाई



 
 
नवी दिल्ली : बार काउन्सिल ऑफ इंडियाने आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून कॉंग्रेस नेते कबिल सिब्बल, अभिषेक संघवी आणि विवेक तनखा यांना सर्वोच्च न्यायालयातील काही सुनावण्यांमध्ये हजर राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे मुख्य न्यायाधीश असलेल्या प्रकरणांच्या सुनावणीमध्ये या पुढे या तिघांनाही कसल्याही प्रकारची वकिली करता येणार नाही. तसेच त्यामध्ये कसल्याही प्रकारे सहभाग देखील घेता येणार नाही, असे काउन्सिलने स्पष्ट केले आहे.
 
 
 
आज सकाळीच काउन्सिलने या संबंधी प्रस्ताव मांडून तो आपल्या बैठकीत पारित देखील केला आहे. या तिघांवरही वेगवेगळे आरोप लावण्यात आले असून या तिघांमुळे न्यायालयाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्याचे काउन्सिलने म्हटले आहे.
 
 
सिब्बल यांनी राममंदिराची अंतिम सुनावणी ही २०१९ नंतर व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप काउन्सिलने केला आहे. तसेच संघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाविरोधात बंड करणाऱ्या 'त्या' चार न्यायाधीशांना आपला पाठींबा दिला होता, तर तनखा यांनी सरन्यायाधीशांविरोधात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची काही चर्चा देखील केली होती. या दोघांच्या कृत्यामुळे न्यायालयाची अंतर्गत सुरक्षितता आणि गोपनीयता धोक्यात आल्याचे काउन्सिलने म्हटले आहे. त्यामुळे या तिघांवरही काही प्रकरणांसाठी बंदी घालण्याच्या निर्णय काउन्सिलने घेतला आहे.

 
 
काउन्सिलच्या या निर्णयानंतर कॉंग्रेस नेत्यांकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. परंतु सोशल मिडीयावर मात्र काउन्सिलच्या या निर्णयाचे सामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. काउन्सिलने घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य असून त्याला आमचा पाठींबा आहे, असे ट्वीट अनेकांनी केले आहे.



 
 
@@AUTHORINFO_V1@@