पुण्यामध्ये रंगला संघाचा 'स्वरांजली' सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018
Total Views |



पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव दाते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांताकडून आयोजित करण्यात आलेला 'स्वरांजली' हा कार्यक्रम आज पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानात हा सोहळा पार पडला. यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, अधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 
 
 
 

बापूराव दाते यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून संघाच्या प. महाराष्ट्र प्रांताकडून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प.महाराष्ट्र प्रांतामधून निवडक घोष पथकांना निमंत्रित करण्यात आलेले होते. मैदानच्या मध्यभागी प्रथम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने घोषांचे संचालन घेण्यात आले. यानंतर प्रत्येक घोषावर संघाच्या अनेक प्रसिद्ध रचनांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे बापूराव दाते यांनी स्वतः  अनेक राग आणि रागिणीमध्ये तयार केलेल्या रचना देखील याठिकाणी सादर करण्यात आल्या व या मार्फतच बापूरावांना संघाकडून आदरांजली वाहण्यात आली. 

@@AUTHORINFO_V1@@