देशातील सर्व रेल्वे स्थानके एलईडी दिव्यांनी प्रकाशमान : पियुष गोयल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : देशातील सर्व रेल्वे स्थानके ही एलईडी दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आल्याची माहिती रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत शेअर केली.
 
 
 
भारतीय रेल्वेने उर्जा आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची पाऊले उचलली असून त्या अंतर्गत मुख्य ध्येय गाठले आहे. ३० मार्च २०१८ पर्यंत भारताची सर्व रेल्वे स्थानके एलईडी दिव्यांनी प्रकाशमान केली असून त्यामुळे प्रत्येक वर्षाला ३५० करोड रुपये किंमतीची बचत होणार आहे, तसेच हे ध्येय निर्धारित वेळेच्या एक दिवस आधीच पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी या ट्विटमध्ये दिली आहे. 
 
 
 
भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील मुख्य रेल्वेसेवांमध्ये गणली जाते. त्यामुळे त्यात होणाऱ्या सोयीसुविधांबरोबरच उर्जा आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा देखील विचार केला जाणे महत्वाचे आहे. त्यामुळे या एलईडी दिव्यांमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यास नक्कीच मदत होईल. 
@@AUTHORINFO_V1@@