मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
 
इंदौर : मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये शनिवारी रात्री एका हॉटेलची चार मजली जीर्ण इमारत कोसळली असल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एमएम असे या हॉटेलचे नाव असून शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही इमारत कोसळली.
 
 
 
तसेच, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून काही नागरिक अडकले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली आणि घटनास्थळी बचाव कार्य सुरु केले. तसेच, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
 
 
 
सुमारे ४० जण या ढिगाऱ्याखाली अडकले आहे अशी माहिती सध्या मिळत आहे. मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. महापालिकेने या इमारतीला धोकादायक जाहीर केले होते मात्र तरी देखील या इमारतीत नेहमीप्रमाणे हॉटेल व्यवसाय सुरु होता. सध्या तरी या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
 
 
या दुर्घटनेबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुख: व्यक्त केले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी जखमी नागरिकांना ५० हजार तर ज्या नागरिकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत रक्कम जाहीर केली आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@